Asrani Passes Away: 'आधे इधर जाओ, आधे उधर जाओ', शोलेतील जेलर असराणी काळाच्या पडद्याआड

Continues below advertisement
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांचे मुंबईत निधन झाले, ते ८४ वर्षांचे होते. 'आधे इधर जाओ आधे उधर जाओ' या 'शोले'मधील संवादाने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. १ जानेवारी १९४१ रोजी जयपूरमध्ये जन्मलेल्या असरानी यांनी १९६७ मध्ये 'हरे कांच की चुडियाँ' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. 'शोले'मधील जेलरच्या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले. याशिवाय 'चुपके चुपके', 'छोटी सी बात', 'खट्टा मीठा', 'नमक हराम' आणि 'बावर्ची' यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. विनोदी भूमिकेसोबतच त्यांनी गंभीर आणि चरित्र भूमिकांमधूनही आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola