Zero Hour : नमाज पठण करणे हा गुन्हा होऊ शकत नाही, Anwar Rajan यांचं थेट स्पष्टीकरण
Continues below advertisement
शनिवारवाड्यात (Shaniwarwada) नमाज पठणाच्या (Namaz Row) वादावर Anwar Rajan यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले, 'हा गुन्हा होऊ शकत नाही', असं थेट मत मांडलं. Anwar Rajan यांच्या मते, शनिवारवाड्यात प्रवेशासाठी प्रत्येक व्यक्तीचं नाव, मोबाईल नंबर आणि आयडी तपासला जातो, त्यामुळे कोण कोण आत गेला याची नोंद असते. नमाज पठणाबाबत त्यांनी स्पष्ट केलं की, मुस्लीम समाज प्रवासात किंवा कुठेही असताना नमाज पठतात आणि यात गुन्हा नाही. त्यांनी लोकशाही आणि प्रगल्भतेचा उल्लेख करत, 'प्रत्येकाची भक्ती मनात असते, मग प्रदर्शन का करावं?' असा सवालही उपस्थित केला. शनिवारवाडा हा संरक्षित क्षेत्र असल्याने प्रवेशावर कडक नियंत्रण असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement