Maharashtra Monsoon : पुढील 24 तास मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
19 Jul 2021 11:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुसळधार पावसामुळं काल मुंबईत मृत्यूतांडव पाहायला मिळालंं... दरड आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या दुर्घटनेत ३० जणांना जीव गमवावा लागला.. पावसाचं हे रौद्र रुप पाहुन मुंबईसह लगतच्या शहरांची झोप उडाली असतानाच, आज मुंबईसह कोकणाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर १९ ते २२ जुलै या कालावधीसाठी मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तिकडे सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, नांदेड, बीड, जालना, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव आणि परभणीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.