Weather Update :वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद,तापमान चार अंशांनी घसरलं
Continues below advertisement
उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येतोय. थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरात कालच्या तुलनेत आज पारा चांगलाच घसरलाय. वेण्णा लेक परिसरात मध्यरात्री शून्य अंश तापमानाची नोंद झालेली आहे. तर सकाळी सहा वाजता वेण्णालेकवर एक अंश तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत वेण्णालेकवर तापमान तब्बल चार अंशांनी घसरलं आहे. तापमान शून्य अंशांवर आल्याने महाबळेश्वरात दवबिंदू गोठले होते. त्यामुळे महाबळेश्वरात काश्मीरसारखा आभास होत होता. पर्यटकही गुलाबी थंडीचा आनंद लुटताना दिसले.
Continues below advertisement