Vedat Marathe Veer Daudale Saat Special Report : 24 फेब्रुवारी 1674, नेमकं काय घडलं त्या दिवशी?

Continues below advertisement

Vedat Marathe Veer Daudle Saat Movie: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या आगामी चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात अक्षय कुमार याचा शिवाजी महाराज यांच्या वेषातील लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या सिनेमात मला ही संधी राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली आहे, असं अक्षय कुमार यावेळी म्हणाला आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुढील दिवाळीमध्ये सिनेमा प्रदर्शित होईल आणि या डिसेंबर महिन्यापासून चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram