Vedanta Foxcon : मविआ सरकारच्या दिरंगाईमुळे वेदांता फॉक्सकॉन राज्याबाहेर?
Continues below advertisement
राज्यातील प्रकल्प अन्य राज्यात जात असल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना आता आरटीआय अंतर्गत नवी माहिती समोर आलीय. मविआ सरकारच्या दिरंगाईमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचं एमआयडीसीनं आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीत समोर आलंय. जानेवारी २०२२ मध्ये वेदांता कंपनीने गुंतवणुकीसंदर्भात एमआयडीसीकडे अर्ज सादर केला होता. पण त्यावर हायपॉवर कमिटीची बैठक नवं सरकार अस्तित्वात आल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये झाली अशी माहिती एमआयडीसीनं दिलीय. ठोस निर्णय घेण्यासाठी सहा महिन्यांत हायपॉवर कमिटीची बैठकच झाली नसल्याचं या माहितीतून कळतं. दरम्यानच्या काळात सत्तासंघर्षामुळे या गुंतवणुकीकडेही दुर्लक्ष झालं का असाही प्रश्न उपस्थित होतोय.
Continues below advertisement
Tags :
Allegation State Project RTI Vedanta Foxconn MIDC Mavia Govt. Dirangai Investment Application