Vedanta Foxconn Gujarat : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानं ब्लेमगेम ABP Majha
Continues below advertisement
Vedanta Foxconn Gujarat : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं खापर महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारकडे बोट दाखवलं. केंद्र सरकार आणि कंपनीशी बोलून प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करू असंही शिंदे यांनी सांगितलं..... दरम्यान वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने महाविकास आघाडीने शिंदे - फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवलीय... महाराष्ट्रानं फक्त हा प्रकल्प गमावला नाहीय.. तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या लाखो संधी देखील गमावल्यात.
Continues below advertisement