ShivJayanti 2020 | उस्मानाबादमध्ये नऊ हजार वृक्षांपासून साकारली शिवप्रतिमा | ABP Majha
उस्मानाबादेतल्या वाशी येथे 18 प्रजातींच्या 9 हजार वृक्षरोपणातून शिवप्रतिमा साकारण्याची अभिनव कल्पना साकारण्य़ात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्तानं वाशीतील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या प्रांगणात ही अनोखी शिवप्रतिमा राजकुमार कुंभार यांनी वृक्षरोपणातून साकारली आहे.