Maharashtra Politics:वसंतदादा शुगर इन्सिट्युट चौकशीसंबधी संशयकल्लोळ,बैठकीचं इतिवृत्त 'माझा'च्या हाती
Continues below advertisement
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या बातम्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावर भूमिका स्पष्ट केली आहे. ‘वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गाळप हंगाम बैठकीच्या इतिवृत्तामध्ये साखर आयुक्तांमार्फत तपासणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचनांचा स्पष्ट उल्लेख आहे. दुसरीकडे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे वृत्त फेटाळताना, तक्रारी आल्याने चौकशी होत असून, काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कारण नाही, असे म्हटले आहे. या प्रकरणी केवळ पैशांच्या विनियोगाबद्दल माहिती मागवण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे, तर विरोधकांनी हा राजकीय सूडबुद्धीचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement