Extradition Row: 'Nilesh Ghaywad ला ताब्यात द्या', पुणे पोलिसांची UK High Commission कडे मागणी

Continues below advertisement
पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ (Nilesh Ghaywad) याच्या प्रत्यार्पणासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) आता युनायटेड किंगडमच्या (UK) उच्चायुक्तालयाला पत्र लिहिले आहे. 'निलेश घायवडचा शोध घेऊन त्याला ताब्यात देण्याची मागणी' या पत्राद्वारे करण्यात आली आहे. घायवळवर आडनाव बदलून आणि खोट्या पत्त्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवल्याचा गंभीर आरोप आहे. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (MCOCA) गुन्हा दाखल असून, तो सध्या लंडनमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि गोळीबार असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणी पुणे पोलीस त्याच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola