Varsha Gaikwad : राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांवर वर्षा गायकवाड कडाडल्या

Varsha Gaikwad : राहुल गांधींवर टीका करणाऱ्यांवर वर्षा गायकवाड कडाडल्या

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये (Nashik) आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नाशिकचे उपमहानगरप्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात अपशब्द उच्चारले जाणे सहन केले जाणार नाही, असेही दराडे यांनी स्पष्ट केले आहे. दराडेंच्या या इशारावजा वक्तव्यामुळे काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून पक्ष आक्रमक पवित्रा घेत असल्याचे चित्र आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बाळा दराडे सहभागी झाले होते. यावेळी एबीपी माझाशी बोलताना बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, “आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत राहतो, याचा आम्हाला अभिमान आहे. राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी जे अपशब्द वापरले, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या शैलीत राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे. सावरकरांविरोधात कोणीही अपशब्द वापरला, तर आम्ही शांत बसणार नाही. जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली. राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, आणि जर ते शक्य नसेल तर दगडफेक करण्याची वेळ येईल,” अशी धमकी बाळा दराडे यांनी दिली होती.   

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola