Voter List Row: उद्याच्या मोर्चात काँग्रेस सहभागी होणार, पण 'ते' नेते निर्णय घेतील - Varsha Gaikwad
Continues below advertisement
मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उद्या, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विरोधी पक्षांच्या मोर्चातील काँग्रेसच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. 'उद्याच्या मोर्चाला काँग्रेसमधून कोणी जायचं याचा निर्णय आमचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला घेतील,' असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. बोगस मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), आणि मनसे या पक्षांसह काँग्रेसही सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात आणि मोर्चात काँग्रेसचे कोणते प्रमुख नेते दिसतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement