Zero Hour Vande Mataram Row : वंदे मातरमवरून Abu Azmi, Praveen Darekar आमनेसामने, वाद पेटला
Continues below advertisement
राज्य सरकारने शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम म्हणण्याचं सर्क्युलर काढल्याने वादाला तोंड फुटलं आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी याला विरोध केलाय, तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आझमींवर टीकेची झोड उठवली आहे. 'आपल्या देशात राहून वंदे मातरम बोलणार नाही अशा प्रकारची जर हिंमत येत असेल तर मला वाटतंय ह्या प्रवृत्ती, या औलादी ठेचून काढण्याची आवश्यकता आहे,' अशी जहाल टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. याउलट, अबू आझमी यांनी म्हटले आहे की, 'अल्लाह के अलावा और किसी की वंदना करना इस्लाम में जायज नहीं है'. राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सरकारने हा निर्णय घेतला आहे. या देशातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी देशभक्तीची गीतं गायली पाहिजेत आणि जातीय तेढ निर्माण होता कामा नये, याची जबाबदारी सर्व नेत्यांनी घेण्याची गरज असल्याचे मत चर्चेत व्यक्त करण्यात आले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement