Congress News : राज ठाकरेंमुळे काँग्रेसची कोंडी, महामोर्चावरून पक्षात उघड मतभेद
Continues below advertisement
राज्यातील विरोधी पक्षांच्या 'सत्याच्या मोर्चा'वरून काँग्रेसमध्ये (Congress) संभ्रम निर्माण झाला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उत्तर भारतीयांविरोधी भूमिकेमुळे, बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले की, 'उपस्थितीबाबतचा अंतिम निर्णय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नेथला (Ramesh Chennithala) घेतील.' या मोर्चात राज ठाकरे सहभागी होणार असल्याने काँग्रेसला बिहारमध्ये फटका बसण्याची भीती आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी वैयक्तिक कारण पुढे करत या मोर्चापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर पक्षाकडून केवळ बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे महाविकास आघाडीतील (MVA) ऐक्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement