Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर राजकारणात पुन्हा सक्रिय होणार, अकोल्यात पक्षवाढीसाठी बैठकीचे आयोजन
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. 14, 15 आणि 16 ऑक्टोबरला प्रकाश आंबेडकर अकोल्यात पक्षवाढीसाठी बैठका घेणार आहेत. या तीनही दिवशी आंबेडकर पक्षसंघटना आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी आज रात्री आंबेडकर अकोल्यात पोहचतील.