Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

Continues below advertisement

Vaibhavi Deshmukh Dharashiv : हुंदका दाटला, डोळे भरले! बापासाठी लेकीचं भाषणच वैभवी देशमुख UNCUT

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा, या मागणीसाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, या मोर्चासाठी संभाजी राजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, देशमुख कुटुंबिय उपस्थित आहेत. धाराशिव शहरातील राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत (MOCCA)कारवाईवर आमदार संदीप क्षीरसागर समाधानी नाहीत. या प्रकरणाचा मास्टर माईंड वाल्मिक कराड आहे. त्याला सहआरोपी करा ही मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. सात आरोपींवरती मोक्का लावलाय, पण वाल्मिक कराडवर मोक्का (MOCCA)लागला पाहिजे. वाल्मिक कराड याचे नाव 302 मध्ये टाकून त्याला सह आरोपी केलं पाहिजे. एखाद्या आरोपाला व्हीआयपी सारखी ट्रीटमेंट दिली जाते. धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितले आहे की तो माझा निकटवर्ती आहे. मग केवळ त्यामुळे त्यांना अशा पद्धतीने वागणूक दिली जातेय का? एखादा आरोपी सरेंडर होताना स्वतःच्या गाडीतून येतो हे राज्यातील पहिली केस असावी, असा घणाघात आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी केला आहे.

संतोष देशमुख हत्याकांडातील सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID कडून कारवाईला जोर आला असून सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणाऱ्या असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सर्व दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत यावर प्रतिक्रिया देणार नसल्याचे सांगितलंय. (MOCCA)

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram