Vaibhav Gehlot यांच्यावर फसवणूकीचा आरोप, पावणे सात कोटींची फसवणूक गुन्हा दाखल : ABP Majha
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट संघाचे अध्यक्ष वैभव गहलोत यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. नाशिकमधील व्यापारी सुशील पाटील यांनी गहलोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केलाय. राजस्थान विभागाच्या ई-टॉयलेट या पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी राज्याचे सर्व टेंडर देण्याच्या नावाने पावणेसात कोटींचा गंडा घालण्यात आल्याचा आरोप सुशील पाटील यांनी केलाय. स्वस्तात कंत्राट मिळवून देतो असं सांगून फसवणूक करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केलाय. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर वैभव गहलोत यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.