Jalgaon Vaccination : जळगावात दोन दिवसांनंतर लसीकरण सुरू, रांगेत उभं राहण्यामुळे दोन गटात तुफान राडा
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवस पासून लसीकरण बंद होते त्या नंतर आज पासून पुन्हा लसीकरण सुरू झाल्याने जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून आले आहे यावेळी अनेक जण आपला नंबर लावण्यासाठी विविध क्लृप्त्या लावल्या जात आहेत. अशातच वशिले बाजी करीत आपला नंबर लावण्याच्या तयारीत असल्याच्या संशयावरून बाचाबाची झाली, त्याचे नंतर हाणामारीत रूपांतर झाल्याने या वेळी लसीकरण केंद्रावर मोठा गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. या हाणामारीची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे.