Nandurbar Vaccination: नंदुरबारच्या नवापूरमध्ये मृत महिलेच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबारच्या नवापूरमध्ये एका मृत महिलेच्या नावानं लसीकरण प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जयाबेन पारेख यांनी १७ मार्च रोजी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर २६ मार्चला त्यांना कोरोनाची लागण झाली आणि ७ एप्रिलला रोजी त्यांचं निधन झालं होतं. मृत्यू होऊन आठ महिने उलटल्यानंतर २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्यांनी दुसरा डोस घेतल्याचा संदेश आणि प्रमाणपत्र मोबाईलवर आला. जयाबेन यांच्या मुलानं या याबाबत माहिती दिल्यानंतर नंदुरबारमधील लसीकरणातील भोंगळ कारभार समोर आला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करू असं अशी माहिती प्रशासनानं दिली.
Continues below advertisement