UV Rays : सूर्याचा इंडेक्स धोक्याच्या पातळीवर, पुढील चार दिवस अतिनील किरणांमुळे घराबाहेर पडणे टाळा!

एकीकडे वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाचा शॉक लागण्याची शक्यता असताना सूर्याचाही प्रकोप झाल्याचं दिसून येतंय. कारण पुढील चार दिवस राज्यात उष्णतेच्या लाटेचा धोका हवामान खात्यानं वर्तवला आहे. सूर्याचा यूव्ही इंडेक्स धोक्याच्या पातळीवर पोहोचल्यानं सूर्याच्या अतीनील किरणांची तीव्रता वाढलेय. त्यामुळे मार्च महिन्यात सलग दुसऱ्यांदा हे उष्णतेच्या लाटेचं सावट आहे... या आधी 17 ते 19 मार्च या काळात कोकण आणि विदर्भात ही लाट आली होती. आता आजपासून 31 तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट असणार आहे.. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातल्या काही शहरांचा पारा तर 43 अंशांपार गेलेला आहे... दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील किमान चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola