Uttarakhand Couldburst : देवभूमीत हाहाकार! उत्तरकाशीत ढगफुटी; 10 जण बेपत्ता, 04 जणांचा मृत्यू

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरालीत भूस्खलन झाले असून, खीरगंगा परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ आणि दगड खाली आले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धरालीतील ढगफुटीमुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, पन्नासपेक्षा अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे. खीरगंगा परिसरातून एकशे तीस जणांना वाचवण्यात यश आले आहे. एसडीआरएफचे पथक युद्धपातळीवर बचावकार्य करत आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील अकरा पर्यटक खीरगंगा परिसरात अडकले होते, ते आता घटनास्थळापासून एकशे पन्नास किलोमीटर दूर सुखरूप असल्याची माहिती आहे. या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर उत्तरकाशी, अल्मोडा, पिथोरागढ, चमोली आणि रुद्रप्रयाग या पाच जिल्ह्यांमधील बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गंगोत्री महामार्गावर रस्ते वाहून गेल्याने आयटीबीपी आणि एनडीआरएफचे जवान अडकले आहेत. हर्सिलमधील लष्कराचा कॅम्पही वाहून गेला असून, काही जवान बेपत्ता आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola