Uttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकर

Continues below advertisement

Uttam Jankar Baramati : बारामतीत अजित पवारांचा पराभव करूनच पक्ष सोडणार - उत्तम जानकर मी सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असलो तरी आता त्यांना बारामती मध्ये पाडूनच मी पक्ष सोडणार असे थेट आव्हान माळशिरस येथील उत्तम जानकर यांनी अजित पवार याना दिले आहे . आज वेळापूर येथे मोहिते पाटील व उत्तम  जानकर  यांचे ३० वर्षाचे वैर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या मेळाव्यात संपले . यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर यांनी आता महायुतीला माढा , सोलापूर आणि बारामती या तीनही मतदारसंघात पराभूत करणार असा दावा केला . आपण सध्या अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत असलो तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांना पराभूत करणार आणि मगच पक्ष सोडणार अशा शब्दात दादांना आव्हान दिले आहे .

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram