America on Balch Army : अमेरिकेकडून बलूच लिबरेशन आर्मी दहशतवादी संघटना म्हणून घोषित

अमेरिकेने भारतावर Tariff बॉम्ब टाकत असतानाच पाकिस्तानला कुरवाळणे सुरू ठेवले आहे. याचाच एक परिणाम म्हणून अमेरिकेने स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या बलुचिस्तानची कोंडी केली आहे. Trump सरकारने Baloch Liberation Army (BLA) आणि तिची सहकारी संघटना Majid Brigade यांना थेट दहशतवादी संघटनांच्या यादीत टाकले आहे. दुसरीकडे, २७ ऑगस्टपासून लागू होणाऱ्या अमेरिकेच्या Tariff धोरणाला उत्तर देण्यासाठी भारताने पावले उचलली आहेत. भारत ५० देशांच्या साथीने या खेळीला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. यात प्रामुख्याने आफ्रिका आणि आखाती देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये भारताची एकूण निर्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि ती आणखी वाढवली जाण्याची शक्यता आहे. सोबतच, Britain सोबत केलेल्या करारामुळे दोन्ही देशांतील व्यापार १२० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढणार आहे. भारताचा European देशांसोबतचा करार अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे अमेरिकेच्या Tariff बॉम्बमुळे होणारे नुकसान या व्यापारातून भरून काढले जाईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola