Maharashtra Investment | महाराष्ट्रात डेटा सेंटर, लॉजिस्टिक्समध्ये मोठी गुंतवणूक, JNPT क्षमता दुप्पट
महाराष्ट्रामध्ये देशाची साठ टक्के डेटा सेंटर क्षमता उभी राहिली आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी डेटा सेंटरची आवश्यकता असते. राज्यात डेटा सेंटर, लॉजिस्टिक्स आणि इतर क्षेत्रांमध्ये वीस हजार कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक होणार आहे. सिंगापूरच्या तमासॅक कंपनीने मणिपाल विकत घेतले आहे. मणिपालसोबत नागपूरमध्ये सातशे कोटी रुपयांचे रुग्णालय बांधण्याचा करार झाला आहे. मेपल ट्रीसोबत तीन हजार कोटी रुपयांच्या लॉजिस्टिक पार्कसाठी करार करण्यात आला आहे. जेएनपीटीमध्ये सिंगापूर पोर्ट अथॉरिटीने तयार केलेल्या टर्मिनलचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलमुळे जेएनपीटी पोर्टची क्षमता दुप्पट होणार आहे. जेएनपीटी पोर्ट आता देशातील सर्वात मोठा कंटेनर हाताळणारा पोर्ट बनला आहे. सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि महाराष्ट्रातील एका प्रतिनिधीने या कामाचा आढावा घेतला. भारताचे पंतप्रधान आणि सिंगापूरचे पंतप्रधान या टर्मिनलचे उद्घाटन करणार आहेत.