UPSC मध्ये महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100  हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.
             
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.  यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram