UP Toll Protestदिवाळी बोनससाठी कर्मचाऱ्यांचे हटके आंदोलन,Agra-Lucknow Expressway केला 2तास टोल-फ्री!

Continues below advertisement
उत्तर प्रदेशातील आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर (Agra-Lucknow Expressway) फतेहबाद टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांनी दिवाळीचा बोनस कमी मिळाल्याने एक आगळेवेगळे आंदोलन केले. दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर, कंपनीने 'दहा टक्के पगारवाढीचे' आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. धनत्रयोदशीच्या रात्री झालेल्या या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी टोलनाक्याचे गेट उघडे ठेवले, ज्यामुळे सुमारे पाच हजार वाहने टोल न भरता पुढे गेली. यामुळे टोल वसूल करणाऱ्या 'श्री साइन अँड दातार' (Shri Sign & Datar) कंपनीला अंदाजे पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेनंतर, कंपनी व्यवस्थापनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवले असून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola