Untimely Monsoon : अवकाळी पावसाचा तडाखा फळबागांनाही, रब्बी पिकांना मोठा फटका
Continues below advertisement
अवकाळी पावसाचा तडाखा फळबागांनाही बसलाय. मागील 2 दिवसांपासून बरसणाऱ्या संततधारेमुळे कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी अडचणीत आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील आंबा पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळून पडण्याची भीती बळीराजाला आहे. तिकडे साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधला स्ट्रॉबेरीचं पीकही धोक्यात आलंय. शेतकऱ्यांनी फवारणी करून आपले स्ट्रॉबेरीचे प्लॉट शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र सतत बरसणाऱ्या पावसामळे महाबळेश्वरातील शेतकरी चिंतेत आहे. स्ट्रॉबेरीचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापुरातील द्राक्षबागांचंही अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय.
Continues below advertisement