इमर्जन्सी ब्रेक लावले अन् वांगणी रेल्वे स्थानकावरील तो अपघात टळला, 'अनसंग हिरो' विनोद जांगिद
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
25 Apr 2021 08:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवांगणी स्टेशन वर एक्सप्रेस समोर आलेल्या लहान मुलाचे प्राण वाचवताना मयूर शेळके ने दाखवलेल्या हिम्मतिला तोड नाही. मात्र त्या मुलाचे प्राण वाचविण्याचे श्रेय मयूर सोबत आणखीन एका व्यक्तीला देखील जाते. जी व्यक्ती आज पर्यंत कधीच पुढे आली नाही, त्यांना कोणीही शाबासकी दिली नाही, त्यांना कोणीही पुरस्कार दिले नाहीत. मात्र त्यांनी जर समयसूचकता दाखवली नसती तर मयूर सोबत त्या लहान मुलाचे प्राण देखील गेले असते. ती व्यक्ती म्हणजे त्या एक्सप्रेस चे लोको पायलट विनोद जांगिड सर.