Unseasonal Rain 'फवारणीचा खर्चही परवडेना', Nashik मधील द्राक्ष उत्पादक चिंतेत, पिकांचं अतोनात नुकसान

Continues below advertisement
नाशिकच्या निफाड तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा आणि मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 'पावसामुळे झालेल्या चिखलात फवारणीसाठी ट्रॅक्टर चालवणे अशक्य झाले असून फवारणीचा खर्चही आवाक्याबाहेर गेला आहे', अशी व्यथा द्राक्ष उत्पादक संघाने मांडली आहे. शनिवारी आणि रविवारी झालेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष शेतीला बसला असून अनेक द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे रोगांपासून पिकाला वाचवण्यासाठी फवारणी करणे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आव्हान ठरत आहे. पाण्यामुळे आणि चिखलामुळे शेतात यंत्रसामुग्री नेण्यात अडचणी येत असल्याने द्राक्ष उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola