Pune SRA Protest : एसआरए कार्यालयावर भव्य मोर्चा, वंचित आघाडीचा भ्रष्टाचाराचा आरोप
Continues below advertisement
पुण्यातील एसआरए (SRA) कार्यालयाबाहेर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन करण्यात आले. एसआरए'मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार (Corruption) होत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. 'पाच वर्षांपर्यंत ज्यांनी कामकाज सुरू केलं नाही, त्या कंत्राटदारांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा', अशी थेट मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. यासोबतच, झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांची घरे (500 Sq. Ft. Homes) देण्याचा प्रस्ताव पाठवावा आणि विकासकांकडून १५ हजार रुपये भाडे (Rs 15,000 Rent) वसूल करावे, अशा मागण्याही करण्यात आल्या. जे नागरिक अपात्र ठरले आहेत, त्यांच्या अपिलांवर (Appeals) महिन्याभरात निर्णय घ्यावा, असेही आंबेडकरांनी म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement