Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा : ABP Majha
Continues below advertisement
ऐन एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.. आता एप्रिल संपत आला तरी अवकाळी मात्र जायचं नाव घेत नाही.. हवामान विभागानं महाराष्ट्रात पुढील ५ दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिलाय.. तर मराठवाड्यासह विदर्भाला ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिलाय... सोबतच मध्य महाराष्ट्रासह, मराठवाडा, विदर्भात पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलायं.. एवढंच नाही तर २ दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसानं चांगलीच बॅटींग केलेय. ज्यामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झालाय.. आठवड्याभरापासून सातत्याने सुरु असलेल्या अवकाळी आणि वादळी वाऱ्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय..
Continues below advertisement