Maharashtra Politicsआरोप करण्यासाठी महिलेला 50 लाख दिले,यशवंत मानेंची टीका;उमेश पाटलांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement
मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'ज्या त्याच्या बापाला याचा अभिमान आहे, लपडी करण्याचा, मुली नासवण्याचा माझ्या पोरांना भरपूर अनुभव आहे', अशा शब्दात उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर टीका केली आहे. दुसरीकडे, यशवंत माने यांनी उमेश पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. माने यांच्या म्हणण्यानुसार, एका महिलेने त्यांना सांगितले की, राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यावर खोटे आरोप करण्यासाठी तिला उमेश पाटील यांच्याकडून ५० लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. यावर उत्तर देताना उमेश पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावत, संबंधित महिलेच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि माने यांनी पोलिसांवर दबाव आणून कारवाई होऊ दिली नाही, असा दावा केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola