Maharashtra Politics: 'मुंबई निवडणूक झाल्यावर BJP त्यांना संपवेल', Eknath Shinde यांना इशारा
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून बोलताना त्यांनी पदाचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही नेत्याच्या नातेवाईकावर कारवाईची मागणी केली. 'गुन्हेगारांना जामीन आणि नेत्यांना जमीन, असे या सरकारचे ब्रीदवाक्य झाले आहे,' असा घणाघाती आरोप रोहित पवार यांनी केला आहे. त्यांनी दावा केला की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात जमीन घोटाळे वाढले आहेत. तसेच, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर भाजप एकनाथ शिंदे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करेल, असा खळबळजनक दावाही पवार यांनी केला. याशिवाय, चुकीच्या कामांना पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या साखळीचीही चौकशी झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement