Umesh Patil : मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय? : उमेश पाटील
Umesh Patil : मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय? : उमेश पाटील
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याऐवजी अजितदादांची लाडकी बहीण योजना अशी जाहिरात वादाच्या गर्तेत आहेे. त्यावरून आता महायुतीत खटके उडतायत...कॅबिनेटच्या बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांचं या जाहिरातीकडे लक्ष वेधलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंकडे याबाबत विचारणा केली...त्यावर बीडच्या कार्यक्रमात शिंदे, फडणवीसांच्या नावाचा उल्लेख होता अशी आठवण धनंजय मुंडेंनी करून दिली..अखेर लाडकी बहीणच्या अनुषंगाने एक एसओपी तयार करुयात अशी भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडली..यावर आता राष्ट्रवादीनं जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचा उल्लेख राहिला तर आक्षेप घेण्यासारखं काय, अशी आक्रमक प्रतिक्रिया दिलीय...'अनाथांचा नाथ एकनाथ' या जाहिराकडे राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी बोट दाखवलंय...