Ulhasnagar : आईच्या 50व्या वाढदिवशी मुलाकडून सरप्राईज हेलिकॉप्टर राईड; आई म्हणते... ABP Majha

Continues below advertisement

उल्हासनगरमधील एका मुलानं आपल्या आईला तिच्या ५० व्या वाढदिवशी सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली. मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर झाले. उल्हासनगरच्या प्रदीप गरड यानं त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. आईच्या ५० व्या वाढदिवसाला हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली. त्यानुसार चौकशी करून त्यानं सगळी तयारी केली. वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं. तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. रेखा गरडसह मुलगा प्रदीप, प्रदीपचं लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram