Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

Continues below advertisement

Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

 शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर आता उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे  यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा सुरू केला आहे. आज ते खासदार संजय देशमुख यांच्या वाशिम-यवतमाळ संघाच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे  यांनी सभा घेतली यावेळी त्यांनी फुटलेल्या खासदारांवर तोफ डागली, त्यांनी सर्वांचा विश्वासघात केल्याचं सांगत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी यावेळी फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ देखील दाखवला यामध्ये त्यांनी आधी एकदा आईची शपथ घेत मी शिवसेना ठाकरेंसोबत राहणार असल्याचं सांगितलं होतं. संजय देशमुखांनी आईची शपथ घेऊन गद्दारी केली, आता त्या आईला काय वाटत असेल? असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला आहे.फुटीर खासदार संजय देशमुख यांचा एक जुना व्हिडीओ दाखवला त्यामध्ये संजय देशमुख बोलताना म्हणतात की,  जेव्हा हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच एक वाक्य मला आजही आठवते की, मी वयाच्या पंधराव्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की, जेव्हा कोणी संकटात असेल, तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे, आज शिवसेना संकटात होती, माझी आई 83 वर्षाची होती तिने सुद्धा सांगितल शिवसेनेसाठी आपल्याला जायचं आहे.आता आईची आठवण आलेली आहे, मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य कर म्हणून आज म्हणून मी ठाकरेंच्या बरोबर आहे. आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर एक गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली विशेषतः माझी झाली, आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की, जेव्हा कोणी संकटात अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तरी ठाकरे उभा आहे, मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने नऊ खासदार आपल्या हक्काचे मशालीवरती निवडून आणले होते, ती फोडण्याची वेळ का आली असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola