Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!

Continues below advertisement

Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!

पुण्यासह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्याप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. केतन अग्रवाल हा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता. तो अवघ्या 22 वर्षांचा होता. त्याचे पुण्यातील सिया गोयलया तरुणीशी लग्न ठरले होते. मात्र, सिया गोयल हिचे चेतन चौधरी  या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी 18 जूनला केतन अग्रवाल याला लोहगडावरुन 400 फूट खोल दरीत ढकलून त्याची हत्या केली होती. सियाच्या या कृत्यानंतर तिच्या वडिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ते सध्या अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सियाच्या आई-वडिलांनी रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी या दोघांनाही सिया दोषी असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे स्पष्टपणे सांगितले. यामध्ये जो कोणी दोषी असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, मग माझी मुलगी का असेना. माझ्या मुलीचा दोष असेल तर माझ्या मुलीला लोहगडावर केतनला जिथून ढकलून दिले होते तिथूनच ढकला, असे सियाची आई पूजा गोयल यांनी म्हटले. सियाचे वडील प्रवीण गोयल यांनीही, जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे मत व्यक्त केली. केतन अग्रवाल याचे कुटुंबीय सियाबाबत आता जे काही बोलत आहेत, त्यांनी या गोष्टी आधीच आम्हाला सांगायला पाहिजे होत्या. तुमची मुलगी जे करतेय ते चांगलं नाही, तुम्ही तिला समज द्या, असे त्यांनी सांगायला हवे होते. आम्ही आमच्या मुलीला समजावलं असतं, ओरडलो असतो, काहीतरी केलं असतं, असे सियाच्या वडिलांनी म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola