Maharashtra : मुख्यमंत्री चहापानाला गैरहजर, हिवाळी अधिवेशनाला लावणार का हजेरी?
Continues below advertisement
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. देशातील इतरही काही राज्यांमध्ये दोन, तीन किंवा पाच दिवसांची अधिवेशने झाली आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचे सावट लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करुन हे अधिवेशन घेणार असल्याचे अजित पवार म्हणाले. या अधिवेशनात शक्ती विधेयक मांडले जाणार असल्याचं त्यांनी सांगितले. विरोधकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याची राज्य सरकारने तयारी ठेवली असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
Continues below advertisement