Uddhav Thackeray Beed : 'दगाबाज सरकारला दगेनेच मारा', ठाकरेंचा थेट हल्ला
Continues below advertisement
बीडच्या पाली गावात उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. 'सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनेच मारलं पाहिजे', असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती जूनपर्यंत ढकलल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आणि तात्काळ कर्जमुक्तीची मागणी केली. 'लाडकी बहीण' योजनेतील भेदभावावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी ५० हजार रुपये आणि वाहून गेलेल्या जमिनीसाठी माती देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी रस्त्यावर उतरून 'चक्का जाम' करतील, असा थेट इशारा ठाकरे यांनी दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement