MCA Election : 155 पंचांच्या समावेशावरून वाद, Mumbai Cricket Association निवडणुकीला High Court मध्ये आव्हान
Continues below advertisement
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (Mumbai Cricket Association) निवडणुकीचा वाद आता मुंबई हायकोर्टात (Bombay High Court) पोहोचला असून, एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीपाद हळबे यांनी या प्रक्रियेला आव्हान दिले आहे. 'पात्र उमेदवारांची नावे गुरुवारपर्यंत जाहीर करू नका', असे स्पष्ट निर्देश हायकोर्टाने निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. हळबे यांनी निवडणुकीत घटनेचे उल्लंघन झाल्याचा आणि तब्बल 155 पंचांचा नियमबाह्य पद्धतीने मतदार यादीत समावेश केल्याचा गंभीर आरोप केला आहे. 24 ऑक्टोबर रोजी मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच आपण यावर आक्षेप घेतला होता, मात्र त्यावर कोणताही आदेश दिला गेला नाही, असा युक्तिवाद हळबेंनी कोर्टात केला आहे. या याचिकेमुळे निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता असून, पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement