Uddhav Thackeray : मुंबई विकत घ्याल तर इथेच थडगं बांधू, ठाकरेंचा थेट इशारा
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. 'त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील, तर यांना मुंबईतच आडवं करून ह्यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधवावं लागेल,' असा घणाघाती इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असताना मोरारजी देसाई यांनी मराठी माणसांवर 'शूट ॲट साईट'चे आदेश दिले होते, याची आठवण करून देत, तेव्हा गोळ्यांनी न झुकलेला मराठी माणूस आता पैशानेही झुकणार नाही, असे ते म्हणाले. चहा विकणारे पंतप्रधान चहावरच जीएसटी लावत असल्याची टीकाही त्यांनी केली. तसेच, निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील चुका न सुधारल्यास निवडणुका होऊ द्यायच्या की नाही, हे ठरवावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement