Weather Alert : राज्यात पुढील २-३ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Continues below advertisement
राज्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर पुढील दोन ते तीन दिवस आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे', असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या हवामान बदलांमुळे मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) तर काही ठिकाणी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola