Thackeray vs Shinde SC : अपात्रतेचा मुद्दा लक्षात घेतला तर बहुमताचा आरडा घटेल : सरन्यायाधीश

Continues below advertisement

राज्यातल्या सत्तासंघर्ष सुनावणीत आज तिसऱ्या दिवशीही घमासान सुरू. कपिल सिब्बल यांचा आक्रमक पवित्रा.न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष.दोन दिवस ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर आजही ठाकरे गटाचा  युक्तिवाद होणार आहे.अभिषेक मनु सिंघवी आणि देवदत्त कामत हे ठाकरे गटाचे वकील आज युक्तिवाद करतील.राज्यात 30जून 2022 रोजी  शिंदे - फडणवीस यांचं सरकार आलं. त्यापूर्वीच म्हणजे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलंय...  याला आता 8 महिने झालेत. क्षांतर बंदी कायदा, विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष शिवाय राज्यपालांचे अधिकार तसेच पक्षप्रतोदांची भूमिका आदी अनेक अंगांनी सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर ठाकरे आणि शिंदे गटाकडून कायद्याचा अक्षरश: कीस काढला जातोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram