Uddhav Thackeray Vidhansabha : वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागांसाठी ठाकरे गट आग्रही
चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा जागांवर शिवसेना उबाठा गटाने केला दावा... वरोरा, चंद्रपूर आणि बल्लारपूर या 3 जागा महाविकास आघाडीत शिवसेनेला मिळाव्या या साठी पक्ष आग्रही, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांना सादर केला अहवाल, याच अहवालाच्या आधारावर 3 जागा शिवसेनेने लढविण्याची करण्यात आली मागणी # वरोरा ही शिवसेनेची पारंपरिक सीट असल्याने वरोरा साठी केलाय आग्रह # 2014 ला चंद्रपूरची जागा स्वबळावर लढल्यावर शिवसेनेने घेतली होती 52 हजार मतं, काँग्रेस सलग 7 वेळा चंद्रपूर विधानसभेत पराभूत झाल्याने ही जागा शिवसेनेला देण्याची मागणी # 7 वेळा सलग हरल्यामुळे काँग्रेस नी बल्लारपूर विधानसभा शिवसेनेला द्यावी या ठिकाणी शिवसेनेची तयारी भक्कम असल्याचा रवींद्र शिंदे यांचा दावा शिवसेनेच्या या दाव्यामुळे काँग्रेस पुढील अडचणी आणि महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची शक्यता