On Ground Check: 'मदत पोहोचली का?' CM Fadnavis यांच्या पॅकेजनंतर Uddhav Thackeray थेट शेतकऱ्यांच्या बांधावर.
Continues below advertisement
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी जाहीर केलेल्या मदतीचा आढावा घेणार आहेत. 'सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला आहे की नाही याचा आढावा हे ठाकरे स्वतः फिल्डवर उतरून घेणार आहेत.' अतिवृष्टी आणि ढगफुटीसदृश पावसाने मराठवाड्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ₹31,628 कोटींच्या मोठ्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, अनेक भागांत शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) आपल्या 'दगाबाज रे' संवाद दौऱ्याची सुरुवात करून, थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी करणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement