Vote Chori Row: 'ज्यांची नोट चोरी थांबली, त्यांना वोट चोरी आठवतेय', फडणवीसांचा ठाकरेंना टोला
Continues below advertisement
बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections 2025) पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या. यावेळी त्यांनी नितीश कुमार (Nitish Kumar), तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि ठाकरे बंधू (Thackeray Brothers) यांच्यावर विविध मुद्द्यांवरून भाष्य केले. 'ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, त्यांना आता वोट चोरी आठवत आहे', असा थेट हल्लाबोल फडणवीसांनी महाराष्ट्रातील मतदार यादीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या ठाकरे बंधूंवर आणि महाविकास आघाडीवर केला. बिहारमध्ये NDA पुन्हा सत्तेत येईल आणि नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. RJD च्या 'जंगलराज'ला जनता विसरलेली नाही आणि मोदी-नितीश यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास वेगाने होत आहे, असेही ते म्हणाले. बिहारमधील तरुणांना आता राज्याबाहेर नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही, कारण NDA सरकारने तसा रोडमॅप तयार केला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement