Diwali 2021 : दिवाळीत निर्बंध आणखी शिथिल होणार? उद्धव ठाकरे यांची आज 3 वाजता टास्कफोर्सशी चर्चा
Continues below advertisement
यंदाची दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करता येऊ शकते. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्यामुळे राज्य सरकारचा दिवाळीत निर्बंध आणखी शिथिल करण्याचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 3 वाजता कोरोना टास्कफोर्सशी चर्चा करणार आहेत.
यावेळी हॉटेल आणि दुकानांची वेळ मर्यादा वाढवण्याविषयी, लोकलप्रवासात काही प्रमाणात शिथिलता देण्याविषयी मुख्यमंत्री कोरोना टास्क फोर्सशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शिवाय, लहान मुलांच्या लसीकरणाविषयीही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे टास्क फोर्सनं राज्य सरकारच्या निर्बंध शिथिल करण्याला हिरवा कंदील दिल्यास नागरिकांना निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येईल.
Continues below advertisement