Mumbai Pune महामार्गावर आकुर्डीजवळ भरधाव वेगात येणारी दुचाकी पेटली,अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू
पुणे - मुंबई महामार्गावर सुसाट वेगाने निघालेल्या दुचाकीवरील दोघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेने या अपघाताची भीषणता लक्षात येते. कारण अपघातानंतर दुचाकीने देखील पेट घेतला. तर मृत तरुण आणि तरुणीमध्ये 40 ते 50 फुटांचे अंतर होते. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डी परिसरात हा अपघात रविवारच्या दुपारी झाला.