![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/11/256b70501f6dcc86a139ada2783baaba1702289701380261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Uddhav Thackeray Full PC : विकास धारावीकरांचा हवा, मोदींच्या मित्राचा नाही, अदानी-मोदींवर घणाघात
Continues below advertisement
नागपूर: सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज कलम 370 (Article 370) च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं ऐतिहासिक निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकानं जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं म्हटले आहे. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं आम्ही स्वागत करतो. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सप्टेंबरपर्यंत तिथे निवडणुका व्हाव्यात, जेणेकरून तिथले लोक मोकळा श्वास घेतील, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दिली आहे. तसेच काश्मिरी पंडितांना मतदान करता येईल याची गॅरंटी मोदींनी द्यावी, असा खोचक टोला ठाकरेंनी या वेळी लगावला आहे.
Continues below advertisement