Uddhav Thackeray Dhule Full Speech :मुनंगटीवार,मोदींचे संस्कार काढले;ठाकरेंनी विरोधकांना धारेवर धरलं
धुळे : मोदी सरकार थापेबाज सरकार आहे. थापेबाज सरकारला पुन्हा निवडून आणायचे नाही. दोन सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहेत. आम्ही प्रेमाने जरूर आलिंगन देऊ मात्र जर कोणी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर वाघ नखं बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर केली आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
Tags :
Dhule Lok Sabha Shivsena Maharashtra Maharashtra Lok Sabha ELections #uddhav Thackeray Dhule Lok Sabha